By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
Aa
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Reading: लाडकी बहीण योजनेमुळेच मध्य प्रदेश मध्ये भाजपाचे सरकार आले, म्हणून महाराष्ट्रातही ही योजना लागू केली – आमदार रत्नाकर गुट्टे
Share
Aa
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Search
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Have an existing account? Sign In
Follow US
Online News Portal of Dainik Zadazadati > Blog > परभणी > गंगाखेड > लाडकी बहीण योजनेमुळेच मध्य प्रदेश मध्ये भाजपाचे सरकार आले, म्हणून महाराष्ट्रातही ही योजना लागू केली – आमदार रत्नाकर गुट्टे
गंगाखेडपरभणीमराठवाडाराजकारण

लाडकी बहीण योजनेमुळेच मध्य प्रदेश मध्ये भाजपाचे सरकार आले, म्हणून महाराष्ट्रातही ही योजना लागू केली – आमदार रत्नाकर गुट्टे

Dhanaji Chavan
Last updated: 2024/10/03 at 9:01 AM
Dhanaji Chavan Published October 3, 2024
Share
SHARE

लाखो करोडो रुपयांचा अपहार करून बरेच जण विदेशात पळून गेले मग लाडक्या बहिणींना पैसे दिले तर काय वाईट आहे

भाजप सहयोगी पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे वक्तव्य

परभणी प्रतिनिधी
मध्यप्रदेश मध्ये भाजपचे सरकार येणार नाही असा सर्वे येत होता. आणि त्याच परिस्थितीत भाजपने मध्य प्रदेश मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. याचा फायदा असा झाला की तब्बल दोन तृतीयांश आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. आणि पुन्हा एकदा भाजपचे सरकार मध्य प्रदेश मध्ये स्थापन झाले. ही योजना एवढी प्रभावी असल्याने महाराष्ट्रामध्ये देखील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. देशातील बऱ्याच व्यापाऱ्यांनी लाखो करोडो रुपयांना चुना लावून परदेशात पळून जाण्याचा पराक्रम केला मग लाडक्या बहिणींना काही कोटी रुपये खर्च केले तर काय वाईट आहे असे वक्तव्य गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आशा वर्कर अंगणवाडी सेविकांचा भव्य असा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलत होते.

पुढे बोलताना आमदार गुट्टे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली आणि आता विरोधक ही योजना जास्त दिवस चालणार नाही बंद पडेल अशी अफवा पसरवत आहेत. पण एखादी योजना सुरू होऊ शकणार नाही पण जी योजना सुरू झाली आहे ती सहजासहजी बंद करता येणार नाही. उलट लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये सध्या मिळत आहेत त्यामध्ये वाढ ही होऊ शकते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कधीच येणार नाही कारण त्यांच्याकडे दानत नाही आतापर्यंत जे काही देण्यात आले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री समर्थपणे महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे त्यामुळे राज्यात येणारे सरकार महायुतीचेच असेल असेही आमदार गुट्टे म्हणाले.

लाखो करोडो रुपयांचा चुना लावून उद्योगपती देश सोडून गेले मग लाडक्या बहिणींना मदत केली तर काय चुकले

आपण पाहिलं की देशातील बऱ्याच उद्योगपतींनी लाखो करोडो रुपयांचा घोटाळा केला आणि देश सोडून पसार झाले. हजारो कोटी रुपयांचा चुना या उद्योगपतींनी आपल्या देशाला लावला. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी काही हजारो कोटी रुपये खर्च केले तर काय चुकले असेही आमदार गुट्टे म्हणाले. लाडकी बहीण योजना ही एक प्रभावी योजना असून सर्वसामान्य महिलांना याचा चांगलाच फायदा आहे ही योजना लागू करताना देखील एका विशिष्ट प्रवर्गातील महिलांनाच ही योजना लागू केली नसून सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यामुळे या योजनेपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देखील वगळण्यात आले नाही.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता स्पष्ट होत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही महिलांच्या प्रती संवेदनशील तेथून पुढे आलेली नसून 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठेतरी महायुतीला आपला पराभव दिसत आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठीच ही योजना सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या या विधानानंतर मात्र आता सर्वत्र महायुतीच्या निर्णयानविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करावी – सदस्य डॉ.पी.पी.वावा

महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Dhanaji Chavan October 3, 2024 October 3, 2024
Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
मराठवाडामहाराष्ट्रमुख्य बातमी

अंगणवाड्या स्मार्ट करण्यावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Dhanaji Chavan Dhanaji Chavan October 22, 2023
55 गावे,12 प्रभागातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण – आ. डॉ. राहूल पाटील यांची माहिती
राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – खासदार संजय जाधव
विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू
महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics
© Dainik Zadazadati. All Rights Reserved. Developed by : M&D Infotech, Latur.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?