By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
Aa
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Reading: राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – खासदार संजय जाधव
Share
Aa
Online News Portal of Dainik ZadazadatiOnline News Portal of Dainik Zadazadati
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Search
  • Home
  • मुख्य बातमी
  • देश -विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • परभणी
    • गंगाखेड
    • जिंतूर
    • पाथरी
    • पालम
    • पूर्णा
    • मानवत
    • सेलू
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • क्रीडा
  • व्हिडिओ न्यूज
Have an existing account? Sign In
Follow US
Online News Portal of Dainik Zadazadati > Blog > परभणी > राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – खासदार संजय जाधव
परभणीमराठवाडामहाराष्ट्रमुख्य बातमी

राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – खासदार संजय जाधव

Dhanaji Chavan
Last updated: 2023/11/30 at 9:21 AM
Dhanaji Chavan Published November 30, 2023
Share
SHARE
परभणी
परभणी जिल्ह्यात मागील मागील तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, ज्वारी, हरबरा या पिकांसह फळबागाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम हातातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देखील करावी अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी देखील परभणी जिल्ह्यात तात्काळ यावे आणि नुकसानीची पाहणी करावी. राज्य सरकारने यापूर्वीही दुष्काळाच्या बाबतीत परभणी जिल्ह्यावर अन्याय केलाच आहे मागील वेळेस जेव्हा दुष्काळ जाहीर झाला आणि मदत करण्याची वेळ आली त्यावेळेस परभणी जिल्ह्याला बघून बाकी सर्वत्र मदत करण्यात आली. यावेळेस तरी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही केवळ पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना त्यावेळेस मदत देण्यात आली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विमा देखील त्यावेळेस विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढून मिळवून देण्यात आला होता.त्यामुळे या सरकारनेही सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी असे खासदार संजय जाधव म्हणाले.
https://youtu.be/rsO7Ojef3hU?si=_VcZa29bdLsCCKVG
महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन शेतकरी हवालदिल असताना तेलंगणामध्ये मुख्यमंत्री प्रचाराला का गेले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणामध्ये प्रचारासाठी जाणे हा त्यांच्या अधिकाराचा विषय असला तरी इकडे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतकरी हवालदिन झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब आपण तेलंगणामध्ये जाऊन प्रचार करत आहात तो कशासाठी तुमच्या पक्षाचा एकही उमेदवार तेथे उभा नसताना तुम्ही हा प्रचार का करत आहात. येणाऱ्या काळात हाच भाजप तुमच्या मुळावर उठणार आहे आणि तुम्ही त्याच भाजपाचा प्रचार करत आहात हे दुर्भाग्य असल्याचेही खासदार संजय जाधव म्हणाले.
पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आता तरी परभणीला यावे
भाजप सरकारच्या काळात परभणी जिल्ह्याला यापूर्वी मिळालेले पालकमंत्री तानाजी सावंत हे ध्वजारोहणाला देखील उपस्थित राहिले नाहीत. त्याचबरोबर आता संजय बनसोडे यांना परभणीचे पालकमंत्री करण्यात आले आहे पण पालकमंत्र्यांची घोषणा होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापह पालकमंत्री संजय बनसोडे परभणीकडे फिरकले नाही. पण आता अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता तरी पालकमंत्री संजय बनसोडे यांनी परभणीला यावे. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची पाहणी करावी आणि राज्य शासनाकडे परभणी जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान खासदार संजय जाधव यांनी केले आहे.

You Might Also Like

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कमटप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करावी – सदस्य डॉ.पी.पी.वावा

महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Dhanaji Chavan November 30, 2023 November 30, 2023
Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
देश -विदेशपरभणीमराठवाडामहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

महाराष्ट्रात मुलींप्रमाणे मुलांनाही फीमाफीची सवलत देण्यास सरकार विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Dhanaji Chavan Dhanaji Chavan October 4, 2024
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ज्वारी आणि कापसाच्या पिकांचे प्रचंड नुकसान
     धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फार्मासिस्ट बनलेल्या परीचराने दिल्या चुकीच्या गोळ्या, बालकाची प्रकृती गंभीर
परभणी महानगर पालिका निवडणूक रासपा स्वबळावर लढणार – रत्नाकर गुट्टे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics
© Dainik Zadazadati. All Rights Reserved. Developed by : M&D Infotech, Latur.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?