स्वतःला भाजपाचा सहकारी आमदार म्हणणारे गुट्टे भाजप संपविण्याचे काम करत आहे
भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीक
परभणी प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची जर बिहार सोबत तुलना केली तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघ दादागिरी मध्ये एक नंबर वर येईल. मागील तीन वर्षांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात लोकांवर सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावणे, प्लॉटवर कब्जा करणे, 376 सारखे गंभीर गुन्हे दखल करणे, प्रत्येकाला मारतो,बघतो ची भाषा आमदार गुट्टे वापरतात. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा बिहार झाला असल्याची परखड टीका भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर केली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे स्वतःला भाजपचा सहयोगी आमदार म्हणतात. पण प्रत्यक्षात 2019 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा युती मध्ये शिवसेनेला सुटला होता आणि विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यावेळेस अपक्ष निवडणूक लढली आणि जिंकली. त्यामुळे ते भाजपचे सहयोगी आमदार नाहीत.
रासपा आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जो निधी आला तो मी आणला असे म्हणत आहेत.पण प्रत्यक्षामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आलेला निधी हा भारतीय जनता पक्षा च्या सरकारने दिलेला निधी आहे. आमदार गुट्टे हे गंगाखेड मतदार संघात भारतीय जनता पार्टी कमकुवत करण्याचे काम करत आहेत. पण मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे येणाऱ्या काळात गंगाखेड विधानसभा मतदार संघामधून कमळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष मी होऊ नये म्हणून आमदार गुट्टे यांनी बरेच प्रयत्न केले. माझे चारित्र्य हनन व्हावे यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना मी पुरून उरलो. रावणाची सोन्याची लंका देखील रावणाच्या अहंकारामुळे जळून खाक झाली. त्यामुळे रत्नाकर गुट्टे देखील आपल्या अहंकारामुळे येणाऱ्या काळात संपून जातील असा टोला मुरकुटे यांनी लागला.
एकीकडे रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात तर दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष मुरकुटे व आमदार गुट्टे यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध पेटले आहे. येणाऱ्या काळात हे आणखीन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.