Online News Portal of Dainik Zadazadati https://zadazadati.com We gives your all type of news from Parbhani aswell as whole world. Thu, 30 Nov 2023 14:51:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी – खासदार संजय जाधव https://zadazadati.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%a6%e0%a5%81/ https://zadazadati.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%a6%e0%a5%81/#respond Thu, 30 Nov 2023 14:44:49 +0000 https://zadazadati.com/?p=2636
परभणी
परभणी जिल्ह्यात मागील मागील तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, ज्वारी, हरबरा या पिकांसह फळबागाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम हातातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देखील करावी अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी देखील परभणी जिल्ह्यात तात्काळ यावे आणि नुकसानीची पाहणी करावी. राज्य सरकारने यापूर्वीही दुष्काळाच्या बाबतीत परभणी जिल्ह्यावर अन्याय केलाच आहे मागील वेळेस जेव्हा दुष्काळ जाहीर झाला आणि मदत करण्याची वेळ आली त्यावेळेस परभणी जिल्ह्याला बघून बाकी सर्वत्र मदत करण्यात आली. यावेळेस तरी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही केवळ पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना त्यावेळेस मदत देण्यात आली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विमा देखील त्यावेळेस विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढून मिळवून देण्यात आला होता.त्यामुळे या सरकारनेही सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी असे खासदार संजय जाधव म्हणाले.
https://youtu.be/rsO7Ojef3hU?si=_VcZa29bdLsCCKVG
महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन शेतकरी हवालदिल असताना तेलंगणामध्ये मुख्यमंत्री प्रचाराला का गेले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणामध्ये प्रचारासाठी जाणे हा त्यांच्या अधिकाराचा विषय असला तरी इकडे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतकरी हवालदिन झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब आपण तेलंगणामध्ये जाऊन प्रचार करत आहात तो कशासाठी तुमच्या पक्षाचा एकही उमेदवार तेथे उभा नसताना तुम्ही हा प्रचार का करत आहात. येणाऱ्या काळात हाच भाजप तुमच्या मुळावर उठणार आहे आणि तुम्ही त्याच भाजपाचा प्रचार करत आहात हे दुर्भाग्य असल्याचेही खासदार संजय जाधव म्हणाले.
पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आता तरी परभणीला यावे
भाजप सरकारच्या काळात परभणी जिल्ह्याला यापूर्वी मिळालेले पालकमंत्री तानाजी सावंत हे ध्वजारोहणाला देखील उपस्थित राहिले नाहीत. त्याचबरोबर आता संजय बनसोडे यांना परभणीचे पालकमंत्री करण्यात आले आहे पण पालकमंत्र्यांची घोषणा होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापह पालकमंत्री संजय बनसोडे परभणीकडे फिरकले नाही. पण आता अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता तरी पालकमंत्री संजय बनसोडे यांनी परभणीला यावे. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची पाहणी करावी आणि राज्य शासनाकडे परभणी जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान खासदार संजय जाधव यांनी केले आहे.
]]>
https://zadazadati.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%a6%e0%a5%81/feed/ 0
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ज्वारी आणि कापसाच्या पिकांचे प्रचंड नुकसान https://zadazadati.com/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af/ https://zadazadati.com/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Tue, 28 Nov 2023 09:40:01 +0000 https://zadazadati.com/?p=2633  

जिल्ह्यातील ज्वारी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची शासनाकडे तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी

परभणी
परभणी जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे आतापर्यंत जिल्ह्यातील 23 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे तर जिल्ह्यात सरासरी 65 ते 70 किलोमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला आहे तर काही पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामध्येच जिल्ह्यातील रब्बीच्या ज्वारी व कापूसपिकाचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये जमीन काळी आणि कसदार असल्यामुळे या जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जाते पण ज्वारीच्या पिकाला सगळ्यात मोठा धोका हा पावसापासून असतो यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली होती आणि ही ज्वारी चांगली आली होती. पण काल झालेल्या पावसामुळे ही सगळी ज्वारी भोई सपाट झाली आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्व ज्वारी भुईसपाट झाली. त्यामुळे हे ज्वारीचे पीक 100% हातातून गेल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

 

त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. कापसाचे पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. आणि या कापसाच्या पिकावरच शेतकऱ्याचे वर्षभराचे खर्चाचे नियोजन असते यावर्षी पाऊस मोठ्या खंडाने पडला आणि कमी पडला तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या पाण्यावर या कापसाच्या पिकाला जगवले मोठे केले आणि आता कापूस वेचणीला आला असताना अचानक या अवकाळी पावसाने संपूर्ण कापसाच्या पिकाचे नुकसान केले आहे वेसणीला आलेला कापूस भिजला आणि तो खाली पडू लागला भिजलेला कापूस पिवळा होतो आणि त्याला बाजारात कसल्याही प्रकारचा भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठा हवालदिन झाला आहे.

शेतकऱ्यांवर हे संकट वाढवले असताना काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी शेतकरी मात्र फारच अडचणीत सापडला आहे एकीकडे खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले नाही आणि सोयाबीनला सध्या भावही नाही पाच हजाराच्या वर सोयाबीनचा भाव सरकत नाही अशा होती कापूस या पिकावर.सध्या कापसाला भाव सात हजार रुपये मिळत आहे आणि भविष्यात कापसाला भाव चांगला येईल असे शेतकऱ्याला वाटत होते पण या पावसाने ती अपेक्षा देखील ही राहून घेतली आहे.

 

]]>
https://zadazadati.com/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा बिहार केला-भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीका https://zadazadati.com/ga%e1%b9%85gakhe%e1%b8%8da-vidhanasabha-matadarasa%e1%b9%85ghaca-bihara-kela-bhajapa-jilhadhyak%e1%b9%a3a-santo%e1%b9%a3a-muraku%e1%b9%ade-yanci-ga%e1%b9%85gakhe%e1%b8%8da-vidhanasabha-matadar/ https://zadazadati.com/ga%e1%b9%85gakhe%e1%b8%8da-vidhanasabha-matadarasa%e1%b9%85ghaca-bihara-kela-bhajapa-jilhadhyak%e1%b9%a3a-santo%e1%b9%a3a-muraku%e1%b9%ade-yanci-ga%e1%b9%85gakhe%e1%b8%8da-vidhanasabha-matadar/#respond Sun, 26 Nov 2023 09:59:37 +0000 https://zadazadati.com/?p=2628  

स्वतःला भाजपाचा सहकारी आमदार म्हणणारे गुट्टे भाजप संपविण्याचे काम करत आहे

भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीक

परभणी प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची जर बिहार सोबत तुलना केली तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघ दादागिरी मध्ये एक नंबर वर येईल. मागील तीन वर्षांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात लोकांवर सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावणे, प्लॉटवर कब्जा करणे, 376 सारखे गंभीर गुन्हे दखल करणे, प्रत्येकाला मारतो,बघतो ची भाषा आमदार गुट्टे वापरतात. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा बिहार झाला असल्याची परखड टीका भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर केली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे स्वतःला भाजपचा सहयोगी आमदार म्हणतात. पण प्रत्यक्षात 2019 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा युती मध्ये शिवसेनेला सुटला होता आणि विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यावेळेस अपक्ष निवडणूक लढली आणि जिंकली. त्यामुळे ते भाजपचे सहयोगी आमदार नाहीत.

रासपा आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जो निधी आला तो मी आणला असे म्हणत आहेत.पण प्रत्यक्षामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आलेला निधी हा भारतीय जनता पक्षा च्या सरकारने दिलेला निधी आहे. आमदार गुट्टे हे गंगाखेड मतदार संघात भारतीय जनता पार्टी कमकुवत करण्याचे काम करत आहेत. पण मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे येणाऱ्या काळात गंगाखेड विधानसभा मतदार संघामधून कमळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणणार आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष मी होऊ नये म्हणून आमदार गुट्टे यांनी बरेच प्रयत्न केले. माझे चारित्र्य हनन व्हावे यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना मी पुरून उरलो. रावणाची सोन्याची लंका देखील रावणाच्या अहंकारामुळे जळून खाक झाली. त्यामुळे रत्नाकर गुट्टे देखील आपल्या अहंकारामुळे येणाऱ्या काळात संपून जातील असा टोला मुरकुटे यांनी लागला.

एकीकडे रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात तर दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष मुरकुटे व आमदार गुट्टे यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध पेटले आहे. येणाऱ्या काळात हे आणखीन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

]]>
https://zadazadati.com/ga%e1%b9%85gakhe%e1%b8%8da-vidhanasabha-matadarasa%e1%b9%85ghaca-bihara-kela-bhajapa-jilhadhyak%e1%b9%a3a-santo%e1%b9%a3a-muraku%e1%b9%ade-yanci-ga%e1%b9%85gakhe%e1%b8%8da-vidhanasabha-matadar/feed/ 0
अंगणवाड्या स्मार्ट करण्यावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे https://zadazadati.com/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af/ https://zadazadati.com/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Sun, 22 Oct 2023 06:44:37 +0000 https://zadazadati.com/?p=2624

बीड : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास ३ हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत प्रस्ताव दाखल करताना जागा उपलब्ध असेल तरच प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केल्या.

येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद, अंतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थिती होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इतर कुटुंबांसाठी त्यांनी केलेले कार्य अभिमानास्पद आहे.

महिला व बालविकास विभागतंर्गत महाराष्ट्रात जिल्ह्याने सर्वाधिक 17,000 अंगणवाडी मदतनीसांची भरती करून आदर्श निर्माण केला आहे. शासनाने इयत्ता बारावी उत्तीर्णची अट ठेवली होती. तथापि, आपल्याकडे उच्च शिक्षित महिलांनी अंगणवाडी सेविका म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळे भविष्यात अंगणवाडीमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंगणवाडी सेविकांना शासकीय कामे मोबाईलद्वारे करावी लागतात त्यामुळे सरकारने त्यांना मोबाईल द्यावेत, अशी त्यांची मागणी शासनाच्या विचाराधीन आहे. दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याचेही नियोजन आहे. बालविवाह रोखण्यामध्ये खूप अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर मात करण्यामध्ये बीड जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार बीड येथे एक महिन्याच्या आत बालविवाह रोखण्यासाठी अद्ययावत रेसिडेन्सी कार्यालय देण्याचा प्रयत्न राहील. अंगणवाडी सेविकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात शासन निर्णय घेत आहे. लेक लाडकी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना तीन टप्प्यांमध्ये लाभ देण्यात येईल. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करावेत आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावेत असे आवाहनही त्यांनी केले. यापुढे अंगणवाडीचे वर्ग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमधील एका खोलीमध्ये भरले जावेत यासंदर्भात ठोस कृती निर्णय घेण्यासंदर्भात देखील शासन निर्णय घेत आहे.

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत 13 अंगणवाडी पर्यवेक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तर 5 अंगणवाडी सेविकांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीचे आदेश प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही जणांना वाटप करण्यात आले.

“माझी कन्या भाग्यश्री” च्या लाभार्थींना त्यांचा लाभ वाटप करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील 14 बचत गटांना 1 कोटी 14 लक्ष रुपयाचा निधी देखील त्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी प्रास्ताविक केले.

जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यामध्ये चार लाखापेक्षा अधिक मजुरांचे ऊस तोडीसाठी स्थलांतर होते. यावेळी महिलांनी ऊस तोडीसाठी स्थलांतर करू नये म्हणून त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा तसेच बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर लोकप्रतिनिधींनी जनजागृती करणे नितांत गरजेचे आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

]]>
https://zadazadati.com/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0
२०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर, विकसित बनविण्याचा संकल्प करुया – नितीन गडकरी https://zadazadati.com/%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%aa%e0%a5%ad-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae/ https://zadazadati.com/%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%aa%e0%a5%ad-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae/#respond Sat, 21 Oct 2023 12:57:36 +0000 https://zadazadati.com/?p=2617 नागपूर, दि. २१ : २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

नागपूर जिल्हा प्रशासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचा आज कोराडी येथील सेवानंद विद्यालय येथून यात्रेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, सामाजिक आर्थिंक शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे घटक मागे आहेत, त्यांना पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताची अर्थव्यवस्था येत्या काळामध्ये ३ मिलियन डॉलरपर्यंत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाचा कामाला गती देण्यात येईल तसेच ड्रिप इरिगेशनचा उपयोग करण्यात येईल. शेती समृद्ध करून शेतकऱ्यांचा विकास करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यामध्ये १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात संकलित करण्यात आले. तेथून तालुका कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. २२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार आहेत. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे अमृत कलश घेऊन युवक रवाना होतील. १ नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

अमृत कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच जवळपास ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये सेवानंद विद्यालय, सेवानंद पब्लिक स्कुल, स्मिता पाटील विद्यालय महादुला, तेजस्विनी विद्यालय कोराडी, विद्यामंदिर कोराडी, प्रागतिक विद्यालय कोराडी याचा सहभाग होता. लेझीम पथक, ज्ञानेश्वर महाराज भंजन मंडळ महिला ढोलताशा पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा सुरूवातीला उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

नागपूर अपघात मुक्त करण्याचा संकल्प – केंद्रीय मंत्री श्री. गडकरी

देशात रोज दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. यामध्ये १८ ते ३४ वर्ष वयोगटातील युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमामध्ये रूल ऑफ रोडचे पालन करून नागपुरला अपघात मुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले.

]]>
https://zadazadati.com/%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%aa%e0%a5%ad-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae/feed/ 0
देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब अमृत वाटीकेत दिसेल -पालकमंत्री दादाजी भुसे https://zadazadati.com/amrit-kalash-yatra-in-nashik-collection-of-amrit-kalash-from-villages/ https://zadazadati.com/amrit-kalash-yatra-in-nashik-collection-of-amrit-kalash-from-villages/#respond Sat, 21 Oct 2023 11:39:44 +0000 https://zadazadati.com/?p=2613 नाशिक : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण आपल्या प्राणांची आहुती देऊन शहीद झाले. त्यांच्या स्मृती, पराक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरावा, यासाठी दिल्ली येथे अमृत वाटीकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या अमृत वाटीकेत देशातील प्रत्येक गावांमधून अमृत कलशांच्या माध्यमातून माती नेण्यात येणार असल्याने या वाटीकेत देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसणार आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

 

कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या अमृत कलश यात्रा कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील एक हजार ९२६ गावांची माती या अमृत कलशांमार्फत दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या अमृत वाटीकेत मिसळली जाणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान गाव पातळीवर अतिशय उत्साहाने साजरे करून तालुकास्तरावरून आणलेले हे अमृत कलश जिल्ह्यामार्फत येत्या काही दिवसांत दिल्लीला जाणार आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहीदांच्या स्मृतींना स्मरण करण्यासाठी सुरू असलेली ही अमृत कलश यात्रा जिल्हावासियांच्या सहभागाने यशस्वी झाली आहे. यासोबतच केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजना तसेच आरोग्य विभागाच्या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या गोल्डन कार्डचा देखील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या साहित्याबाबत २६ ऑक्टोबर रोजी आयोजित शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी केले.

तेज, त्याग, तप, तत्व व तर्क यांचे प्रतिक म्हणजे अमृत कलश यात्रा – केंद्रीय राज्यमंत्री : डॉ. भारती पवार

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे साकरल्या जाणाऱ्या अमृत वाटीकेमध्ये सर्व देशवासियांचा सहभाग असावा या भावनेतून माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाला ऊर्जा देणारा आहे. कलशांमध्ये असलेली ही फक्त माती नसून स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांची गाथा सांगणारा इतिहास या मातीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवर सुरू असणारी ही अमृत कलश यात्रा म्हणजे तेज, त्याग, तप, तत्व व तर्क यांचे प्रतिक आहे. असे सांगत असतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केंद्र सरकारमार्फत सामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वांच्या सहभागाने यशस्वी होत असल्याचेही सांगितले. तसेच अमृत कलश यात्रा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे देखील यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी कौतुक केले.

शहीदांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी अमृत वाटीका : मंत्री छगन भुजबळ

 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत माझी माती माझा देश अभियानाच्या माध्यमातून देशाच्या मातीसाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या स्मृती कायम जागरूक ठेवण्यासाठी दिल्लीत अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती असणारे हे कलश आपल्या देशभक्तीचे प्रतिक आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात देशाप्रती असणारा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. देशाप्रती असलेल्या स्वाभिमानातूनच सर्वांच्या सहभागाने सुराज्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी देशासाठी काम करण्याची भावना सातत्याने मनात असणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला अमृत कलश यात्रेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरगाणा, कळवण व नाशिक तालुक्यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणलेल्या अमृत कलशांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कलशांची कालिदास कलामंदिरापासून जिल्हा परिषदेपर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.

]]>
https://zadazadati.com/amrit-kalash-yatra-in-nashik-collection-of-amrit-kalash-from-villages/feed/ 0
पीक उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने जबाबदारी घ्यावी  – पालकमंत्री हसन मुश्रीफ https://zadazadati.com/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95/ https://zadazadati.com/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95/#respond Sat, 21 Oct 2023 10:08:39 +0000 https://zadazadati.com/?p=2607

रामेती प्रशिक्षण संस्थेच्या वसतीगृहाचे उद्घाटन व शेतकरी मेळावा

कोल्हापूर दि.२1 : दिवसेंदिवस पीक उत्पादकतेत घट होत असून ऊसासह सर्वच पीकांचा यात कमी अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे कृषी विभाग, त्यातील तज्ज्ञांनी उत्पादकता वाढीची जबाबदारी घेण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. वनामती नागपूरच्या अधिनस्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीच्या उद्घाटनानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कसबा बावडा येथील वसतीगृहाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यानंतर शेतकरी मेळावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, शेतकरी, निविष्ठाधारक, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, हल्ली ऊस उत्पादनात एकरी उत्पन्न कमी होत आहे, कारखाने 5-6 महिनेच चालतात, कारखानदारांना काम न करताच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. या वर्षी सर्वात कमी गाळप हंगाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात, इतर पिकांमधे मार्गदर्शन करून कृषी विभागने उप्त्पादन वाढीसाठी ठोस काम करावे, असे ते म्हणाले.

बोगस बियाणे, खते व किटकनाशके यांना आळा घालण्यासाठी शासन कायदा करत असल्याचे सांगितले. बोगस बियाणांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो. शेतकरी हाच आपला वाली आहे, तो राजा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण चांगले कार्य करणे गरजेचे आहे. कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या शेतात चांगली शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडा पार्क येथे शासनाने कृषी विभागास कृषी भवन बांधण्यासाठी जागा दिली आहे. यासाठी पुढिल प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

उद्घाटन केलेल्या रामेतीच्या नवीन वसतीगृहात 80 प्रशिक्षणार्थींच्या व्यवस्थेसाठी 40 खोल्या, 2 व्हीआयपी सूट, डॉरमेटरी, डायनींग, किचन व लायब्ररीची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

आमदारी सतेज पाटील यांनी कृषी विभाग, आत्माच्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांसाठी चांगले प्रयोग राबविण्यात येत असल्याचे सांगितले. रामेतीला आता प्रशस्त अशी प्रशिक्षणार्थी निवास व्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आता कृषी भवनाची गरज असल्याचेही ते म्हणाले. रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रविण बनसोडे यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकांचे विमोचन पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवत्ता प्रमाणपत्र वितरण – पालकमंत्री श्री. मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम बॅच 3 व 4 मधील स्वप्निल पिरकाने, सुनिल जाधव, सोमनाथ पुजारी, प्रकाश साळोखे, विनोद ननवरे आणि दत्तात्रय पवार यांना गुणवत्ता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कृषी अधिकारी अतुल जाधव यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

०००

]]>
https://zadazadati.com/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95/feed/ 0
विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू https://zadazadati.com/a-16-year-old-student-who-consumed-poisonous-medicine-finally-died/ https://zadazadati.com/a-16-year-old-student-who-consumed-poisonous-medicine-finally-died/#respond Sat, 21 Oct 2023 09:15:43 +0000 https://zadazadati.com/?p=2599 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीच नाव आहे. दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं. दरम्यान, विषारी औषध प्राशन करण्यामाील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

आर्या खाडे या शालेय विद्यार्थ्यींनीनं दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करताना विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. थोड्या वेळानं तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आर्याचा मृत्यू झाल्याचं समजताच तिच्या मैत्रिणीना धक्काच बसला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या इम्रानखान शेरखान पठाण (वय 25, रा.जूनी म्हाडा कॉलनी, आर.के.नगर) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी गेल्यावर्षी कोल्हापुरात आली होती. कामाला जात असताना रस्त्यात तिची इम्रानखान पठाण याच्याशी ओळख झाली.

इम्रानखान यानं ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे मोबाईलवर अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आज इम्रानखानला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक कली.

]]>
https://zadazadati.com/a-16-year-old-student-who-consumed-poisonous-medicine-finally-died/feed/ 0
परभणी महानगर पालिका निवडणूक रासपा स्वबळावर लढणार – रत्नाकर गुट्टे https://zadazadati.com/rsp-will-fight-parbhani-municipal-corporation-elections-on-its-own-ratnakar-gutte/ https://zadazadati.com/rsp-will-fight-parbhani-municipal-corporation-elections-on-its-own-ratnakar-gutte/#respond Sat, 21 Oct 2023 09:12:05 +0000 https://zadazadati.com/?p=2597

]]>
https://zadazadati.com/rsp-will-fight-parbhani-municipal-corporation-elections-on-its-own-ratnakar-gutte/feed/ 0
फार्मासिस्ट बनलेल्या परीचराने दिल्या चुकीच्या गोळ्या, बालकाची प्रकृती गंभीर https://zadazadati.com/the-pharmacist-turned-attendant-gave-the-wrong-pills-the-childs-condition-is-critical/ https://zadazadati.com/the-pharmacist-turned-attendant-gave-the-wrong-pills-the-childs-condition-is-critical/#respond Sat, 21 Oct 2023 06:52:54 +0000 https://zadazadati.com/?p=2550 जिंतूर : तालुक्यातील आडगाव बाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार, दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्दी व तापाने आजारी असलेल्या १० व २ वर्ष वयाच्या बालकांस वैद्यकीय अधिकारी यांनी तापीच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन वरती लिहून दिल्या. परंतु फार्मसिस्ट बनलेल्या परिचराने तापी ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्या. यामुळे एका बालकांची प्रकृती बिघडली होती. यावेळी त्वरित उपचार केल्याने दोन्ही बालकांची प्रकृती सुधारली तर एका बालकास जिंतूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आडगाव बाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमेश विलास चव्हाण (वय १०) या बालकाला व्हायरल आजारामुळे आणले असता वैद्यकीय अधिकारी वैशाली जाधव यांनी बालकाला तापीच्या गोळ्या लिहून दिल्या. परंतु फार्मसिस्टचे पद रिक्त असल्याने तात्पुरते फार्मसिस्ट बनलेल्या परिचराने प्रथमेश याच्यासह दोन बालकांना तापी ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्या. बालकाने शुगरची गोळी खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली. तेंव्हा बालकाला त्वरित जिंतूरला दाखल करण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आडगाव बाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भरुन बालकांच्या जीवाशी खेळणा-या दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी बालकांच्या पालकांनी व ग्रामस्थांन मधून होत आहे.

कडक कार्यवाही झाली पाहिजे : चव्हाण

मुलाला मागील दोन तीन दिवसा पासून ताप सर्दी होती म्हणून दवाखान्यात नेले होते. पण तापीच्या गोळ्या ऐवजी मधुमेहाच्या (शुगर) गोळ्या दिल्यामुळे मुलाला उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्याला सतत उलट्या होत होत्या. त्यामुळे जिंतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. मात्र चुकीच्या गोळ्या देणा-यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे असे मत बालकाचे वडील विलास चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

चुकीने गोळी देण्यात आली : वैशाली जाधव
प्रिस्क्रिप्शनवर सर्दी, तापीसाठी गोळी दिली होती. परंतु औषध विभागातील सर्दी तापीच्या डब्यात चुकून शुगरच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे चुकीने बदलून गोळ्या देण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैशाली जाधव यांनी दिली आहे.

चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल : डॉ.बोराळकर

सदरील बालकास शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणी केली असता प्रकृती स्थिर आहे. यातील दोषींवर प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिंतूर तालुका आरोग्य अधीकारी डॉ दिनेश बोराळकर यांनी दिली आहे.

]]>
https://zadazadati.com/the-pharmacist-turned-attendant-gave-the-wrong-pills-the-childs-condition-is-critical/feed/ 0